Cannes 2024 : छाया यांनी परदेशातही जपली मराठी परंपरा

सकाळ डिजिटल टीम

छाया यांची 'कान'वारी

मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी All We Imagine As Light या त्यांच्या सिनेमाच्या स्क्रीनिंग निमित्ताने कान फिल्म फेस्टिव्हलला मराठमोळ्या वेषात हजेरी लावली.

Chhaya Kadam

इंडो वेस्टर्न लूकची चर्चा

त्यांच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी त्यांनी केलेला लूक चर्चेत राहिला.

Chhaya Kadam

असा होता आऊटफिट

काळया आणि सोनेरी रंगाचा प्रिंटेड स्कर्ट, लॉन्ग व्हाईट शर्ट, त्यावर स्ट्राइप असलेला ब्लाउज, त्यावर काळा ब्लेझर, त्याला मॅचिंग नेकलेस आणि मेसी बन या लूकमध्ये छाया सुंदर दिसत होत्या.

Chhaya Kadam

या डिझायनरने डिझाईन केला ड्रेस

सागरिका राय या भारतीय डिझायनरने छाया यांचा आऊटफिट डिझाईन केला आहे. अनेकांनी त्यांच्या या आऊटफिटचं कौतुक केलं.

Chhaya Kadam

पारंपरिक टच

त्यांच्या इंडो वेस्टर्न आऊटफिटला छाया यांनी मराठमोळी नथ घालत पारंपरिक टच दिला.

Chhaya Kadam

लूक झाला व्हायरल

सोशल मीडियावर त्यांचा हा लूक व्हायरल झाला. अनेकांना त्यांनी केलेला हा लूक खूप आवडला. त्यांनी त्यांच्या परंपरेला दिलेला मानही अनेकांना पसंत पडला.

Chhaya Kadam

'कान'मध्ये झालं कौतुक

छाया यांच्या All We Imagine As Light सिनेमाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाली.

Chhaya Kadam

छाया यांना अश्रू अनावर

प्रेक्षकांच्या या प्रतिक्रियेने छाया यांना अश्रू अनावर झाले.

Chhaya Kadam
Deepika
येथे क्लिक करा