Anuradha Vipat
बिग बॉस ओटीटीचं तिसरं सिझन सध्या जोरदार चर्चेत आहे.
या सिझनमध्ये प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकनेही त्याच्या दोन्ही पत्नींसोबत स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे.
यावरुन छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीन भट्टाचार्जीने पुन्हा एकदा अरमान आणि बिग बॉसवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
देवोलीनाने तिच्या एक्स अकाऊंटवर अरमान मलिकची एक क्लिप शेअर केली आहे
क्लिप शेअर करत तिनं लिहिलं आहे की , ‘मी प्रत्येक पुरुषाबद्दल तर बोलू शकत नाही, पण निश्चितपणे ठरकी विचार असणारे पुरुषच दोन, तीन किंवा चार पत्नी ठेवायचा विचार करत असतील.
‘एक दिवशी नक्कीच एखादी मुलगी म्हणेल की तिला दोन मुलांसोबत लग्न करायचं आहे आणि ती दोघांना खुश ठेवेल. तेव्हा किती लोक त्या मुलीची साथ देतील, ते मला पहायचंय असंही देवोलीनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.