Anuradha Vipat
‘आई कुठे काय करते' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
आता अभिनेत्री गौरी कुलकर्णीने सोशल मीडियावर आई कुठे काय करते या मालिकेत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे
तसेच गौरी कुलकर्णीने मालिका संपल्यानंतरच्या भावना देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत व्यक्त केल्या आहेत.
गौरी कुलकर्णीने म्हटलं आहे की, ऑडिशनला घातलेला ड्रेस परत फेअरवेलला घातला. कारण- गौरीतली ‘गौरी’ कायम माझ्यासोबतच होती.
गौरी कुलकर्णीने म्हटलं आहे की, आज निरोप देताना इमोशनलसुद्धा वाटतंय आणि आनंदही होतोय. या शोनं मला सर्व दिलं. ओळख दिली. खूप चांगली माणसं दिली, अनेक अनुभव दिले आणि तुमचं भरभरून प्रेम दिलं.
गौरी कुलकर्णीने म्हटलं आहे की, आयुष्याच्या वहीत दुमडून ठेवलेलं खुणेचं पान म्हणजे माझ्यासाठी ‘आई कुठे काय करते’ ही सीरियल होती आणि राहील
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत