Monika Lonkar –Kumbhar
बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री जेनेलिया देशमुख.
जेनेलिया उत्तम अभिनयासाठी आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. नुकतीच तिने अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला आणि रिसेप्शनला हजेरी लावली होती.
अनंत-राधिकाच्या लग्नााला जेनेलियाने ही गोल्डन रंगाची सुंदर हिमरू साडी परिधान केली होती. यावर तिने मराठमोळा साज केला होता.
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला जेनेलियाने दोन लूक केले होते. तिने केलेला हा दाक्षिणात्य लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
सोनेरी रंगाची साडी त्यावरील लाल शेला आणि दाक्षिणात्य दागिन्यांनी तिच्या लूकला चारचाँद लावले होते.
तिने रिसेप्शनसाठी हा तिसरा लूक केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
तिचा लेहेंगा, दागिने अन् मेकअप सगळंच अगदी परफेक्ट जुळून आलं होत. जेनेलियाचा हा लूक चाहत्यांना कमालीचा आवडला.