Anuradha Vipat
अभिनेत्री जुई गडकरी सध्या छोट्या पडद्यावर सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे.
सध्या अभिनेत्री जुई गडकरी बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
जुई गडकरी ही महिनाभरापासून आजारी आहे. आजारी असूनही ती मालिकेत काम करत आहे.
नुकताचं जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला.
त्यावेळी चाहत्यांनी तिला ताई तू आजारी आहेस का, 'ठरलं तर मग'मध्ये तुझा आवाज वेगळा येत आहे, असा प्रश्न केला.
त्याला उत्तर देताना जुई गडकरीने आपण आजारी असल्याचे मान्य केले. घसा खूप खराब झाला आहे आणि थोडासा तापही आहे. जवळपास महिना झाला असेल असेही तिने सांगितले.