अभिनेत्री कंगना रनौतकडे आहेत 'या' ५ महागड्या गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

कंगना रनौत

नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.

कंगनाची संपत्ती

निवडणुकीवेळी कंगनाने ती ९० करोड रुपये संपत्तीची मालकीण असल्याचं जाहीर केलं. तर कंगनावर तब्बल १७ करोड रुपयांचं कर्ज आहे. जाणून घेऊया कंगनाकडे असलेल्या पाच महागड्या गोष्टींविषयी.

मुंबईतील बंगला

कंगनाने मुंबईत 'पाली हिल हाऊस' विकत घेतला असून या बंगल्याची किंमत २१ करोड रुपये आहे. हा बंगला ३०७५ स्क्वेअर फूटचा आहे.

गुंतवणूक

कंगनाने बरीच गुंतवणूक केली असून तिच्या नावावर ५० एलआयसीच्या विमा योजना आहेत. तर तिने २१ लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले आहेत.

दागिने

कंगनाकडे अत्यंत महागडे दागिनेही आहेत. कंगनाकडे ६.७० किलो सोनं असून याची किंमत ५ करोड रुपये आहे. तर तिच्याकडे १४ कॅरेट किंमतीचे हिरे असून त्याची किंमत ३ करोड आणि ६० किलो चांदी ज्याची किंमत ५० लाख रुपये आहे.

गाड्या

तर कंगनाकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि वेस्पा स्कुटी या गाड्यांची मालकीण आहे.

फार्महाऊस

कंगनाचं मनालीमध्ये फार्महाऊस असून याची किंमत १५ लाख रुपये आहे. या व्यतिरिक्त चंदिगढमध्येही तिचं घर आहे. याशिवाय मुंबई आणि मनालीमध्ये काही कॉर्पोरेट प्रॉपर्टीजही आहेत.

येथे क्लिक करा