परी म्हणू कि....कियाराच्या सौंदर्यासमोर ऐश्वर्याही पडली फिकी

सकाळ डिजिटल टीम

कान फिल्म महोत्सव 2024मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या रेड कार्पेट लूकची चर्चा असतानाच यंदा पहिल्यांदाच कान महोत्त्सवाला हजेरी लावलेल्या कियारा अडवाणीने तिच्या स्टायलिश लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

रेड कार्पेटवरील पांढऱ्या रंगातील तिचा लूक गाजत असतानाच कान महोत्सवाच्या डिनर पार्टीला कियाराने बेबी पिंक आणि ब्लॅक रंगाचं कॉम्बिनेशन असलेल्या ड्रेसमध्ये हजेरी लावली आणि या तिच्या बार्बी लूकने सगळ्यांनाच घायाळ केलंय.

उर्वशी रौतेला आणि ऐश्वर्या यांच्या लुकपेक्षा सध्या कियाराच्या या डिनर लूकची चर्चा सोशल मीडियावर होतेय.

स्ट्रॅपलेस पिंक टॉप आणि त्याला फिशकट गाऊन या क्लासी लूकमध्ये ती मोहक दिसत होती. तिच्या सौंदर्याने सगळेचजण मंत्रमुग्ध झाले.

मिनिमम मेकअप, ब्लॅक हॅन्ड ग्लोव्हज, गळ्यात सुंदरसा नेकपीस आणि हायबन या लूकमध्ये कियारा एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती.

अ नाईट टू रिमेंबर असं कॅप्शन कियाराने तिच्या या फोटोंना दिलंय.

सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल झाले असून कुणी तिला अप्सरा म्हणतंय तर कुणी तिला बार्बी गर्ल अशी उपमा देतंय.

कान रेड कार्पेटवरील पदार्पणावर कियारा खुश असून देशाचं प्रतिनिधीत्व करून तिला आनंद झाला असल्याचं तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. लक्ष्मी लेहेर आणि अभिमन्यू देसाई यांनी तिचा हा लूक स्टाईल केला होता.

लवकरच कियाराच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला दहा वर्षं पूर्ण होणार आहेत.

याशिवाय कियारा राम चरण सोबत 'गेम चेंजर' या सिनेमात काम करतेय तर 'डॉन 3' मध्ये ती रणवीर सिंहसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

या आधी कियाराचे 'सत्यप्रेम कि कथा','गोविंदा नाम मेरा' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.

कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. शेरशाह सिनेमाच्या सेटवर त्यांची जोडी जमली होती.

येथे क्लिक करा