Anuradha Vipat
अभिनेत्री कृष्णा मुखर्जीनं ‘शुभ शगुन’ मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग शेअर केला आहे.
मालिकेच्या सेटवर निर्मात्याकडून झालेल्या छळाविषयी ती सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे.
कृष्णाने पोस्टमध्ये लिहिलं, “मला कधीही मनातील गोष्ट सांगायची हिंमत नव्हती.पण आज मी निर्णय घेतला की ही गोष्ट अजून मनात नाही ठेवू शकतं.
कृष्णाने पुढे लिहिल आहे जेव्हा मी एकटी असते तेव्हा खूप रडत असते. माझ्या आयुष्यातला हा सर्वात वाईट निर्णय होता.मी दुसऱ्यांचं ऐकून ही मालिका करण्याचा निर्णय घेतला होता.
या मालिकेच्या प्रोडक्शन हाउस आणि निर्माता कुंदन सिंहनं मला खूप त्रास दिला. एवढंच नाही तर ऐकवेळ त्यानं मला मेकअप रुममध्ये बंद केलं होतं असंही कृष्णा म्हणाली
जेव्हा मी आजारी असताना मेकअप रुम कपडे बदलत असायची तेव्हा बाहेरून जोरजोरात दरवाजा वाजवायचे, जसं काही दरवाजा आता तोडणारचं आहेत.असंही कृष्णाने तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट लिहिल आहे