Anuradha Vipat
‘अनुपमा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे.
यामध्ये काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदालसा शर्मा मालिकेचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे.
या मालिकेत मदालसा नकारात्मक भूमिकेत झळकली होती.
मदालसा ही ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे
आता मालिका सोडण्यामागचं कारण मदालसाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.
मदालसा म्हणाली, आता मालिकेची कथासुद्धा वनराज, अनुपमा आणि काव्या यांच्यासंबंधीची राहिली नाही. ही भूमिका साकारण्यात आता पहिल्यासारखी मजा येत नाही.
पुढे मदालसा म्हणाली, जर काव्याच्या भूमिकेला आधीसारखंच महत्त्व असतं, तर मी या मालिकेत थांबली असती.