Monika Lonkar –Kumbhar
मराठी आणि हिंदी कलाविश्वाची 'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षित.
पारंपारिकसोबतच माधुरीचा मॉर्डन अंदाज ही चाहत्यांना सतत भुरळ घालत असतो.
माधुरी सतत विविध लूक्समध्ये फोटोशूट करत असते. तिचा अंदाज कधी मॉर्डन तर कधी पारंपारिक असतो, आणि तो तितकाच रॉयल असतो.
नुकतेच माधुरीने या मल्टिकलर साडीमध्ये फोटोशूट केले आहे. तिचा हा मल्टीकलर अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
या पिवळ्या रंगाच्या साडीवर विविध रंगाची नक्षीदार डिझाईन असून यात माधुरी खूपच कमाल दिसतेय.
या मल्टिकलर साडीवर माधुरीने सिंपल मेकअप आणि सोबर ज्वेलरी लूक कॅरी केला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
माधुरी सध्या 'डान्स दिवाने' या डान्स रिआलिटी शोचे परिक्षण करत आहे.