Anuradha Vipat
अभिनेता अर्जुन कपूर याचा आज वाढदिवस आहे.
या निमित्ताने अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीवर मलायकाने एक पोस्ट शेअर केली आहे.
'डोळे बंद केल्यानंतर आणि पाठ फिरवल्यानंतर विश्वास ठेऊ शकतो... अशीच लोकं मला आवडतात...' असं मलायकाचं स्टेटस आहे
वाढदिवस असल्यामुळे मंगळवारी अर्जुनच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती.
मात्र अर्जुच्या बर्थडे पार्टीला मलायका गायब होती.
यावरुन आता 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन - मलायका यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.