Anuradha Vipat
अभिनेत्री मनिषा राणीने नुकताच ‘झलक दिखला जा 11’ या डान्स शोचं विजेतेपद पटकावल आहे
शो जिंकल्यानंतर मनिषाचं जंगी स्वागत करण्यासाठी तिचे कुटुंबीय, नातेवाईक तिच्या घरी पोहोचले होते.
या व्लॉगमध्ये मनिषाने तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा उल्लेख केला आहे.
या व्हिडीओत मनिषा तिच्या वडिलांविषयी बोलते, “माझ्या वडिलांना त्यांच्या डोक्यावरचे केस वाढवायचे आहेत. त्यामुळे सर्वोत्कृष्ट तेल किंवा तेलाची ट्रिटमेंट तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
तसेच माझे वडील त्यांच्या लग्नासाठी मुलगी शोधत आहेत, माफ करा महिला शोधत आहेत. आम्ही वडिलांसाठी लाइफ पार्टनरच्या शोधात आहोत. जर कोणाला त्यांच्यात रस असेल तर कृपया कमेंट करून कळवा असंही मनिषा व्हिडीओत म्हणाली आहे
मनिषा लहान असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता