Anuradha Vipat
माजी मिस वर्ल्ड बॉलिवुड अभिनेत्री मानुषी छिल्लर यंदाच्या लंडन फॅशन वीक मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज होत आहे.
प्रसिद्ध डिझायनर रॉकी स्टारच्या अनोख्या कॉस्च्युम मध्ये ती दिसणार आहे. तिच्या हटके फॅशन सेन्ससह मानुषी सातत्याने चर्चेत असते.
मानुषी छिल्लर केवळ तिच्या ट्रेंडसेटिंग शैलीमुळे फॅशन आयकॉन नाही तर अनेक फॅशन इव्हेंटमध्ये ती सक्रिय राहते आणि आपल्या फॅशन ची झलक प्रेक्षकांना दाखवते.
चॅरिटी फॅशन इव्हेंट्समध्ये उल्लेखनीय म्हणजे मणिपूर फॅशन एक्स्ट्राव्हॅगन्झा 2022 मध्ये तिची उल्लेखनीय वाटचाल जिथे तिने मणिपूरच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाने प्रेरित असलेले एक समूह प्रदर्शित केले
या व्यतिरिक्त, तिने नेपाळ फॅशन वीक 2022 मध्ये अप्रतिम ठसा उमटवला, एका आकर्षक पांढऱ्या लेहेंग्यात रनवेवर शोभा वाढवली आहे
फॅशनच्या ग्लॅमरस दुनियेच्या मानुषी छिल्लर चित्रपटसृष्टीत चमकण्यासाठी सज्ज झाली आहे.
ती आगामी यशराज फिल्म्स प्रोडक्शन "द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये " विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.