त्या गाजलेल्या किसिंग सीनवर अखेर मीनाक्षी यांनी सोडलं मौन

सकाळ डिजिटल टीम

मीनाक्षी शेषाद्री

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी बॉलिवूडमधील एक काळ गाजवला. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले.

बोल्ड भूमिका

मीनाक्षी या त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या बोल्ड भूमिकांमुळेही चर्चेत राहिल्या.

वादग्रस्त सिनेमे

नुकताच मीनाक्षी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या 'विजय' आणि 'डकैत' सिनेमातील गाजलेल्या किसिंग सीनवर भाष्य केलं.

किसिंग सीन

विजय या सिनेमातील अनिल कपूर आणि मीनाक्षी यांचा किसिंग सीन त्यावेळी वादग्रस्त ठरला होता. याबाबत मीनाक्षी म्हणाल्या कि,"मी तो सीन यश चोप्रा आणि अनिल कपूर यांच्यामुळेच करू शकले. ते दोघंही खूप प्रोफेशनल होते आणि त्या सिनेमासाठी तो सीन खूप गरजेचा आहे हे मला माहित होतं."

डकैत

तर डकैत सिनेमातील सीनविषयी त्या म्हणाल्या कि,"डकैत सीनमध्ये त्यावेळी किसिंग सीन होता पण सेन्सर बोर्डामुळे तो काढावा लागला. त्यामुळे त्या विषयी लोकांना माहित नाही. "

सिनेमांमध्ये कमबॅक

साठ वर्षांच्या असलेल्या मीनाक्षी आता पुन्हा सिनेमांमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत.

जान्हवीचं तिरुपती दर्शन - येथे क्लिक करा