Anuradha Vipat
अभिनेत्री झीनत अमानने नुकताच इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तरुणाईला लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत सल्ला दिला आहे
त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली होती
आता आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने झीनत अमान यांच्या या सल्ल्याला थेट चुकीचं ठरवलं आहे.
अभिनेत्री मुमताज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपलं मत मांडलं आहे.
मुलाखतीत मुमताज म्हणाल्या, “मी झीनत यांच्याशी सहमत नाही. अनेक महिने लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतरही तुमचं लग्न यशस्वी होईल याची काय गॅरंटी आहे?
आपल्या मुलींना हा विश्वास दाखवून मोठं करा की त्यांचं अस्तित्व पूर्ण होण्यासाठी कोणत्याही पुरुषाची गरज नाही. माझ्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. लग्नाचं बंधन खूप जपावं लागतं असंही मुलाखतीत मुमताज म्हणाल्या