Anuradha Vipat
आई कुठे काय करते’ मालिकेचा अखेर पाच वर्षांचा प्रवास आता संपणार आहे.
त्यानिमित्ताने आई कुठे काय करते’ मालिकेतील विशाखा म्हणजेच अभिनेत्री पुनम चांदोरकरच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचं शेवटचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं.
यावेळी मालिकेतील कलाकारांना सन्मानचिन्ह देण्यात आलं. या सन्मानचिन्हाचा फोटो शेअर करून पुनम चांदोरकरने पोस्ट लिहिली आहे.
पुनमने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, विशाखा काळजी घे,पाच वर्ष सुरू असलेला हा प्रवास काल पूर्ण झाला. इथून पुढे आता दुसऱ्या प्रवासाची सुरुवात…जिची कुठेही शाखा नाही अशी ‘विशाखा’
पुनमने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘आई कुठे काय करते’चा काल शूटिंगचा शेवटचा दिवस…रात्री गणपती बाप्पा मोरया असे जेव्हा रवी सर बोलले तेव्हा पहिल्यांदा काहीतरी खोलवर जाणवलं
पुनमने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, या मालिकेने, समृद्धीने कलाकार म्हणून माणूस म्हणून खरंच खूप समृद्ध केलं…शेवटचं तिथे मस्तक टेकवलं आणि वास्तूचा निरोप घेतला