Anuradha Vipat
‘शिवा’ ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.
या मालिकेत नुकतंच शिवाने सिलेंडर उचलण्याचा सिन दाखवण्यात आला.
यावर ‘शिवा’ अर्थात अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणाली ज्या दिवशी शूटिंग झालं त्याच्या 3 दिवस आधी माझी तब्बेत प्रचंड बिघडली होती.
पुढे पूर्वा कौशिक म्हणाली, दिग्दर्शक सर आणि मी एकदम जोशात होतो की सिलेंडर उचलायचा आहे. पण जेव्हा मी आजारी पडले तेव्हा वाटलं की हे मला जमेल का कारण खूप अशक्तपणा आला होता.
सरांनी प्रोत्साहन दिलं. शांत डोक्याने आणि मनाने शांत राहा, सगळं बरोबर होईल, असं त्यांनी सांगितलं
तसेच पुढे शूट करताना ही मजा आली आणि याच श्रेय मी मारुती सरांना देते, असं पूर्वाने सांगितलं.