Anuradha Vipat
अभिनेत्री रेश्मा शिंदे रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरांत पोहोचली.
सध्या रेश्मा ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत जानकी नावाचे पात्र साकारत आहे.
काही दिवसांपासून रेश्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती मोठ्या चर्चेत आहे
रेश्माने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
आता रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यामध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रेश्मा शिंदेने केळवणाचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. रेश्मा शिंदेने लिहिलं आहे की, “केळवणाच्या पानात जसे वेगवेगळे पदार्थ असतात, प्रत्येकाचा रंग वेगळा असतो, चव वेगळी असते, काही आंबट काही गोड, काही झणझणीत, तर काही चटपटीत.
रेश्मा शिंदेने लिहिलं आहे की, एखादा पदार्थ नसला, तर पान अपूर्ण राहतं. अगदी तसंच माझं नातं या सगळ्या माझ्या माणसांबरोबर आहे. माझ्या माणसांचा हात धरून नवीन आयुष्याची सुरुवात करतेय.”