Anuradha Vipat
संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी- द डायमंड बझार’ या वेब सीरिजची चर्चा गेल्या महिन्यापासून सर्वत्र सुरू आहे.
अभिनेत्री रिचा चड्ढानं तिचा या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.
नुकत्याच एका पोस्टमध्ये रिचा व्यक्त म्हणाली होती की, एका महिन्यापूर्वी ती टीमबरोबर प्रमोशन्ससाठी कशाप्रकारे सगळीकडे एन्जॉय करत होती.
एका महिन्यापूर्वी ती सात महिन्यांची गरोदर असताना तिने अनेक गोष्टी केल्या याबद्दल रिचाने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
रिचानं या पोस्टला कॅप्शन देत लिहिलं, ‘एका महिन्याआधी ‘हीरामंडी’चे यश साजरे करण्यासाठी आमची मीडियाशी भेट झाली होती. सर्व सहकलाकारांना भेटून मजा आली.
रिचाने पुढे लिहिलं, अजूनही विश्वास बसत नाही की, मी सातव्या महिन्यात या वेब सीरिजचं प्रमोशन करत होते, हाहाहा!”
रिचा चढ्ढा आणि अली फझल यांनी २०२० मध्ये कायदेशीररीत्या लग्न केलं होतं