Anuradha Vipat
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अवनी म्हणजे अभिनेत्री साक्षी गांधी
आज साक्षीने आईच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
साक्षीने पोस्टमध्ये आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तुला कधीच थँक्यू म्हणता नाही आलं गं आणि मला असं वाटतं की आपल्या माणसाला का म्हणावं थँक्यू किंवा का मानावे आभार ? पण तसं नाहीये… एक थँक्यू तो बनता हे यार असं लिहिल आहे
पुढे साक्षीने आई हे थँक्यू आहे, तू आम्हाला चांगली शिकवण दिलीस त्यासाठी…
हे थँक्यू आहे, तू आमच्यावर चांगले संस्कार केलेस त्यासाठी…
हे थँक्यू आहे, तू आम्हाला धीटपणाने जगायला शिकवलं त्यासाठी…असंही लिहिल आहे
साक्षीच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
साक्षीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.