Anuradha Vipat
लग्नाच्या 10 वर्षांनंतर घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री संजीदा शेखने मुलीची जबाबदारी घेतली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत संजीदाने खासगी आयुष्य आणि मुलीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
मुलीबद्दल संजीदा म्हणाली, ‘माझी मुलगी माझी ताकद आहे, तिने मला आयुष्यात हिंमतीने पुढे कसं जायचं हे शिकवलं आहे.
पुढे संजीदा म्हणाली, मला असा वाटतं मी आता पूर्वापेक्षा अधिक स्ट्राँग झाली आहे. मी माझ्यात असलेला कमीपणा मान्य केला आहे आणि स्वतःवर प्रेम करायला शिकली आहे.
संजीदा कायम तिच्या मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
संजीदाने 2012 मध्ये अभिनेता आमिर अली यांच्यासोबत लग्न केलं होतं . लग्नाच्या 9 वर्षांनंतर म्हणजे 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.