Anuradha Vipat
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
नुकतच तिने निर्मिती केलेला नाच गं घुमा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिष्ठाने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे
कास्टिंग काऊचबद्दल बोलताना शर्मिष्ठा म्हणाली, एक वाईट ऑडिशन होती.. मी त्या प्रोडक्शन हाऊसचं नाव घेणार नाही किंवा ते मराठी होतं की हिंदी हेही नाही सांगणार. त्या ऑडिशननंतर मला प्रोडक्शन हाऊसने कॉम्प्रमाईजसाठी विचारलं होतं.
पुढे बोलताना शर्मिष्ठा म्हणाली, कास्टिंग काऊच हा प्रकार घडतो. हाच प्रकार घडला. तेव्हा मी त्यांना धन्यवाद म्हटलं. एकवेळ मी घरी बसेन, नोकरी करेन तेवढी सुशिक्षित मी नक्कीच आहे, पण हे असलं काही मला जमणार नाही.
'माझं जे काही मत असतं ते मी स्पष्टपणे मांडते. त्यासाठी मी लोकांची थोडाबीत देखील खाल्ली आहे. उंच माझा झोकाच्या दरम्यान' असा अनुभव शर्मिष्ठा राऊतने सांगितला.