सकाळ डिजिटल टीम
वय ४२ वर्षे असूनही केवळ २२ वयाची वाटणाऱ्या श्वेता तिवारीचा कमाल फिटनेस आहे
श्वेतीची दोन लग्नं झालेली आहेत. परंतु नाती टिकली नाहीत. आता ती तिसरं लग्न करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय
१९९८मध्ये भोजपुरी अभिनेता राजा चौधरी याच्याशी तिचं लग्न झालं होतं. परंतु २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला
पहिल्या लग्नानंतर श्वेताला पलक नावाची मुलगी झाली. ती सध्या श्वेतासोबत राहाते
त्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत लग्न केलं. परंतु २०१९मध्ये ते वेगळे झाले
दुसऱ्या लग्नानंतर श्वेताला रेयांश नावाचा मुलगा झाला तोही श्वेतासोबत रहातो
दोन अपयशी लग्नानंतर काहींनी तिला तिसरं लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर श्वेता भडकली होती
'तुम्ही १० वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिलात आणि सोडलं तरी कुणी विचारत नाही. परंतु लग्नानंतर २ वर्षानंतर घटस्फोट झाला तरी लोक म्हणतात किती लग्न करणार?' असं ती म्हणालेली
'असा सल्ला देणारे आहेत तरी कोण? हा माझा निर्णय आहे.. हे माझं आयुष्य आहे' अशी प्रतिक्रिया श्वेताने दिली होती
घरगुती हिंसेमुळे श्वेताने पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. मुलासमोरच त्याचे वडील दारु पिवून भांडत असतील तर ते चुकीचं आहे, असं श्वेता म्हणालेली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.