साक्षी राऊत
बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची आज जयंती. हा तिचा साठावा वाढदिवस. श्रीदेवीचा अभिनयात तगडा अनुभव होता. अगदी बालपणापासून ती अभिनयात काम करायची.
१९७७ ते १९८३ या सहा वर्षांच्या काळात १०० चित्रपट करण्याचा रेकॉर्ड तिच्या नावे आहे.
बीटी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत एकदा श्रीदेवीला प्रश्न विचारण्यात आला होता की, "मिस्टर इंडिया करताना तुमचा अनुभव कसा होता. त्यावेळी ती म्हणाली होती की मुलं ही कायमच उत्तम कलाकार असतात."
"माझी मुलगी सुद्धा एक उत्तम कलाकार आहे एक दिवस ती तिच्या अभिनयाने सगळ्यांना चकीत करेल", असं एक वक्तव्यसुद्धा श्रीदेवीने या मुलाखतीत केले होते.
श्रीदेवीचं हे वक्तव्यतर खरं ठरलं मात्र मुलीचा डेब्यू श्रीदेवीला बघता आला नाही. मॉम हा श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ठरला.
जान्हवी आज बॉलीवूडमधली एक उत्तम कलाकार. तिने मागल्या काही वर्षात बरेच चित्रपट केलेत.
आज कमी वयातच बॉलीवूडच्या मोठ्या पडद्यावर झळकणारी अभिनेत्री जान्हवी कपूर ही बहुचर्चित कलाकापरांपैकी एक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.