स्वानंदीने पहिल्या मंगळागौरीचा थाट ; निळ्या साडीतील लूकने वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

गायिका आरती अंकलीकर -टिकेकर आणिअभिनेतेउदय टिकेकर यांची लेक आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने गेल्या वर्षी आशिष कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली.

सोशल मीडियावर त्यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. आशिष आणि स्वानंदीचं अरेंज मॅरेज आहे.

आशिष हा गायक असून इंडियन आयडॉल हिंदी या रिऍलिटी शोमधून तो घराघरात पोहोचला. तर स्वानंदीही एक उत्तम गायिका आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये या दोघांनी लग्न केलं. यांच्या लग्नाला इंडस्ट्रीमधील अनेक मंडळी उपस्थित होती.

श्रावण महिना सुरु झालाय आणि स्वानंदीची पहिली मंगळागौर थाटात पार पडली. सोशल मीडियावर स्वानंदीने तिचे मंगळागौरीचेफोटो शेअर केले आहेत.

निळ्या रंगाची नऊवारी साडी, गुलाबी रंगाचा ब्लाउज, मराठमोळा साज या लूकमध्ये स्वानंदी सुंदर दिसतेय.

तिने या फोटोंना 'श्रावणातील एक मंगळवार' असं कॅप्शन दिल आहे.

अश्विनी यांनी स्वतःच्या लग्नावेळी घरात काढला केर - येथे क्लिक करा