Anuradha Vipat
अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकरने केलेल्या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
महिला अत्याचारांविरोधात ऊर्मिलानं सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पोस्टमध्ये ऊर्मिला म्हणते की, आपण कोणाला मतदान करतो? सोशल मीडियावर त्रागा व्यक्त करणं, मेणबत्त्या लावणं, सर्व पुरुषवर्गाला शिव्या घालणं यापेक्षा आपलं मत नक्की कोणाला जातं?
पुढे पोस्टमध्ये ऊर्मिला म्हणते की, आपल्या आसपासच्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं जनजागृती करण्यासाठी आपलं योगदान काय असावं? यावर विचार व्हावा
महिला अत्याचारांविरोधात मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर तिखट शब्दांत ताशेरे ओढले आहेत
ऊर्मिला नेहमीच सोशल मिडीयावर आपले परखड मतं मांडत असते
ऊर्मिला सोशल मिडीयावर सक्रिय असते