निरोगी आतड्यांसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, पचनाच्या समस्या होतील दूर

Monika Lonkar –Kumbhar

बिघडलेली जीवनशैली

सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या सगळ्यात आतड्यांच्या ही समस्या उद्भवत आहेत.

Gut Health

आतड्यांचे आरोग्य

निरोगी शरीरासाठी आतड्यांचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. आपल्या शरीराची पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आतडे महत्वाची भूमिका बजावतात. हे कदाचित काही लोकांना माहित नसेल. त्यामुळे, आतड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

Gut Health

जर आतडी कमकुवत झाली तर आपल्या शरीराची पचनक्रिया बिघडते. मग, पोटाच्या समस्या किंवा पचनाच्या समस्या सुरू होतात. या समस्या दूर करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या आहारात फायबर्सयुक्त खाद्यपदार्थांचा जरूर समावेश करा. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

Gut Health

हिरव्या पालेभाज्या

आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर्स, जीवनसत्वे, खनिजे आणि पोषकघटक आढळून येतात.

Gut Health

हे सर्व पोषकघटक आपल्या शरीरात चांगले बॅक्टेरिआ वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे, आपल्या शरीरातील आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. त्यामुळे, निरोगी आतड्यांसाठी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायला विसरू नका.

Gut Health

दही आणि ताकापासून बनवलेले खाद्यपदार्थ

दह्यामध्ये कॅल्शिअम, फायबर्स आणि प्रथिनांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, दही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. पोषकघटकांनी समृद्ध असलेले दही आपल्या शरीरातील आतड्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. 

Gut Health

ताक

दह्यामुळे आतड्यांमध्ये होणारी जळजळ कमी होते. यासोबतच संधिवात आणि दमा सारख्या आजारांना दूर ठेवण्याचे काम दही आणि ताक करते. त्यामुळे, दह्यासोबतच ताकापासून बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा आहारात जरूर समावेश करा.

Gut Health

कोरोनानंतर आता 'पॅरट फेवरचे' संकट, जाणून घ्या ही लक्षणे

parrot fever | esakal
येथे क्लिक करा.