Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही दररोज शारिरीक हालचाल करणे आवश्यक आहे.
शारिरीक हालचालींसोबतच रोजचा आहार देखील संतुलित असणे फायद्याचे ठरते.
व्यायाम आणि आहारासोबतच शरीरातील स्टॅमिना वाढवण्यासाठी काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते. कोणते आहेत ते खाद्यपदार्थ? जाणून घेऊयात.
निरोगी आरोग्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. त्यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने आणि पोषकघटक असतात जे स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात.
फायबर्स, कर्बोदकांनीयुक्त असलेले ओट्स आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.
प्रथिने आणि पोषकघटकांनीयुक्त असलेल्या विविध प्रकारच्या कडधान्यांचा आहारात समावेश असणे फायद्याचे ठरते.यामुळे, शरीरात भरपूर ऊर्जा आणि स्टॅमिना राखला जातो.
शारिरीक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि क्षमतेसाठी चिया सीड्स फायदेशीर आहेत.