'आदित्य'ने पहिल्यांदाच टिपले सूर्याचे फुल-डिस्क फोटो, इस्रोने केले शेअर

Sudesh

आदित्य एल-1

भारताच्या पहिल्या सौर मोहिमेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आदित्य उपग्रहाने पहिल्यांदाच सूर्याचे फुल डिस्क फोटो क्लिक केले आहेत.

Aditya L1 Sun Images | eSakal

SUIT

आदित्य उपग्रहावरील SUIT या पेलोडने हे सूर्याचे फुल-डिस्क फोटो टिपले आहेत. विविध प्रकारच्या अल्ट्राव्हायलेंट वेव्हलेंथमध्ये सूर्य कसा दिसतो हे यातून स्पष्ट होत आहे.

Aditya L1 Sun Images | eSakal

फुल डिस्क

यापूर्वी आदित्यने सूर्याचा लाईट सायन्स फोटो टिपला होता. मात्र आता सूर्याच्या दर्शनी भागाचा फोटो टिपण्यात आला आहे. यालाच फुल डिस्क फोटो म्हणतात.

Aditya L1 Sun Images | eSakal

इस्रो

इस्रोने आपल्या इन्स्टाग्राम आणि एक्स हँडलवरून हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सूर्याचे फोटोस्फिअर आणि क्रोमोस्फिअर याबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे.

Aditya L1 Sun Images | eSakal

सूर्याची माहिती

फोटोस्फिअर म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग आणि क्रोमोस्फिअर म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागापासून 2000 किलोमीटर वरपर्यंतचा थर.

Aditya L1 Sun Images | eSakal

वेव्हलेंथ

हे सूर्याचे पहिलेच फुल-डिस्क रिप्रेझेंटेशन असणारे फोटो आहेत. यामध्ये 200 ते 400 nm वेव्हलेंथमध्ये सूर्य कसा दिसतो हे दिसत आहे.

Aditya L1 Sun Images | eSakal

SUIT

सूट हे उपकरण पुण्यातील इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA), मनिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE), CESSI, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, उदयपूर सोलर ऑब्जर्वेटरी, तेजपूर युनिवर्सिटी आणि ISRO ने मिळून तयार केलं आहे.

Aditya L1 Sun Images | eSakal

आदित्य एल-1

आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौरमोहीम आहे. यामध्ये आदित्य हा उपग्रह पृथ्वी आणि सूर्यादरम्यान असणाऱ्या एका लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येणार आहे. जानेवारीमध्ये हा उपग्रह या बिंदूवर पोहोचेल.

Aditya L1 Sun Images | eSakal

सूर्याचा अभ्यास

आदित्यच्या मदतीने सूर्याचा अधिक अभ्यास करता येणार आहे. आताच्या समोर आलेल्या फोटोंमधून देखील सूर्यावरील सौरडाग, वादळे आणि शांत जागा यांचा अभ्यास शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya L1 Sun Images | eSakal