Monika Lonkar –Kumbhar
निरोगी आरोग्य हवे असेल तर त्यासाठी आपण शारिरीक आणि मानसिकरित्या तंदूरूस्त असणे गरजेचे आहे.
शारिरीक आरोग्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते आणि मानसिक आरोग्यामुळे आनंदी आणि तणावमुक्त जीवन मिळते.
योगा, वर्कआऊट आणि एरोबिक्ससोबतच आजकाल आहाराची देखील काळजी घेतली जाते. एरोबिक्समध्ये विविध प्रकारांचा समावेश होतो.
एरोबिक व्यायाम प्रकारांपैकी एक असलेला व्यायाम प्रकार म्हणजे स्विमिंग होय.
धावल्यामुळे कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होते.
एरोबिक व्यायाम प्रकारातील हा अत्यंत महत्वाचा आणि तितकाच फायदेशीर व्यायाम प्रकार आहे.
एरोबिक्स व्यायाम प्रकारामधील सर्वात लोकप्रिय व्यायाम प्रकार म्हणजे सायकलिंग होय. सायकलिंग केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.