Pranali Kodre
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 1 ते 29 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघ सहभागी होणार आहेत. या संघांची आता स्पर्धेच्या दृष्टीने जोरदार तयारीही सुरु झाली आहे.
दरम्यान, अफगाणिस्ताननेही या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली असून सेंट किट्स अँड नेविस येथे ते पोहचले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे.
तसेच अफगाणिस्तानने या स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू ड्वेन ब्रावोला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.
त्यामुळे आता ब्रावो अफगाणिस्तान संघात या स्पर्धेसाठी सामील होईल.
ब्रावोने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर त्याने टी20 लीग स्पर्धेत खेळणे कायम केले होते. तसेच तो गेली दोन वर्षे चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारीही सांभाळत आहे.
ब्रावो टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 625 विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानचा टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीसाठी ग्रुप सी मध्ये समावेश आहे, या ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी आणि युगांडा या संघांचाही समावेश आहे.