अफगाणिस्तानने 12 पैकी 11 संघांना पाजलं पाणी, लिस्टमध्ये भारत...

Pranali Kodre

अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका

अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात १८ सप्टेंबरपासून ती सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे.

Afghanistan | X/ACBofficials

अफगाणिस्तानचा विजय

या मालिकेतील पहिला सामना अफगाणिस्तानने ६ विकेट्सने, तर दुसरा सामना १७७ धावांनी जिंकत इतिहास रचला आहे.

Afghanistan | X/ACBofficials

पहिलाच विजय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही प्रकारातील हा अफगाणिस्तानचे दक्षिण आफ्रिकेवरील पहिलेच विजय ठरले आहेत.

Afghanistan | X/ACBofficials

११ संघांना पराभवाचा धक्का

त्यामुळे आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या १२ संघांपैकी ११ संघांना आता अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किमान एकदा तरी पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे.

Afghanistan | X/ACBofficials

भारताविरुद्ध विजय नाही

मात्र अद्याप अफगाणिस्तानने भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदाही पराभूत केलेलं नाही.

Afghanistan | X/ACBofficials

भारताविरूद्धचे सामने

भारताविरुद्ध अफगाणिस्तानने एक कसोटी, ४ वनडे आणि ९ टी२० सामने खेळले आहेत.

Afghanistan | X/ACBofficials

विजय जवळ होता, पण...

अफगाणिस्तानने २०१८ आशिया कप स्पर्धेत भारताविरुद्ध वनडे सामन्यात बरोबरी केली होती. तसेच २०२४ मध्ये बंगळुरूला झालेल्या टी२० सामन्यांतही बरोबरी झालेली, ज्यात दोन सुपर ओव्हरनंतर भारताने विजय मिळवला होता.

Afghanistan | X/ACBofficials

मोठ्या संघांना पराभवाचा धक्का

अफगाणिस्तानने भारतवगळता आता दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आयर्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांना पराभूत केले आहे.

Afghanistan | X/ACBofficials

बुमराह @400! आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जस्सीने गाठला मोठा टप्पा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasprit Bumrah | Sakal
येथे क्लिक करा