Pranali Kodre
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत मोठी उलथापालथ केली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला सुपर-8 च्या सामन्यात 21 धावांनी पराभवाचा धक्का दिला.
अफगाणिस्तानने बलाढ्य संघाला धक्का देण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याच स्पर्धेत न्यूझीलंडलाही तब्बल 84 धावांनी पराभूत केले आहे.
अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षकपद इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू जोनाथन ट्रॉट जुलै 2022 पासून सांभाळत आहे.
ट्रॉटच्या मार्गदर्शनाखालीच खेळताना अफगाणिस्तानने 2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका यांसारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारली होती.
याशिवाय यंदाच्या टी२० वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तानला ड्वेन ब्रावोचे मार्गदर्शनही मिळाले आहे. या स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने त्याला गोलंदाजी सल्लागार म्हणून नेमले आहे.
याशिवाय अफगाणिस्तानच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सध्या दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू अँड्र्यू पुटीक सांभाळत आहे.
गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी माजी अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू हमिद हसन सांभाळत आहे.
क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाची जबाबदारी ऑस्ट्रेलियाच्या शेन मॅकडरमॉटच्या खांद्यावर आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अफगाणिस्तानला 2023 वनडे वर्ल्ड कपवेळी भारताचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांचेही मार्गदर्शन मिळाले होते. ते त्यावेळी मेंटॉर म्हणून संघासह होते.