Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे चालू आहे. या स्पर्धेत अफगाणिस्तानची कामगिरी शानदार झाली आहे.
अफगाणिस्तानने पहिल्या फेरीतील पहिले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकत सुपर-८ मध्ये प्रवेश मिळवला आहे.
मात्र असे असतानाच अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रेहमानला बोटाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
मुजीबला आयपीएल २०२४ दरम्यानही बोटाची दुखापतीमुळे खेळता आले नव्हते, आता त्याला याच दुखापतीमुळे टी२० वर्ल्ड कपमधूनही बाहेर व्हावे लागले आहे.
मुजीबने या टी२० वर्ल्ड कपमध्ये युगांडाविरुद्ध सामना खेळला होता, ज्यात त्याने ३ षटकात १६ धावा देत १ विकेट घेतली होती.
अफगाणिस्तानने मुजीबच्या जागेवर फलंदाज हझरतुल्ला झझाईला बदली खेळाडू म्हणून संघात संधी दिली आहे.