सकाळ डिजिटल टीम
मराठी इंडस्ट्रीमधील नावाजलेले दिग्दर्शक म्हणजे सचिन पिळगावकर. उत्तम अभिनेते असलेल्या सचिन यांनी बॉलिवूडमध्येही नाव कमावलं.
अशोक सराफ यांच्याशी सचिन यांची खास मैत्री होती. ही मैत्री इतकी घट्ट होती कि, अशोक यांच्या लग्नात त्यांनी निवेदिताचा भाऊ म्हणून सगळे विधी पार पाडले होते.
पण सचिन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं कि, त्यांच्या मैत्रीवर लक्ष्मीकांत बेर्डे खूप जळायचे. सचिन बरोबर आपण काम करू शकत नाही याची त्यांना खंत होती. त्यांना काहीही करून सचिन यांच्याबरोबर सिनेमा करायचा होता.
शेवटी सचिन, अशोक आणि लक्ष्मीकांत यांनी एकत्र मिळून अशी ही बनवाबनवी या सिनेमा एकत्र काम केलं.
या सिनेमात त्यांनी लक्ष्मीकांत यांना घेऊन काम केलं असलं तरीही लक्ष्मीकांत यांच्या मनात धाकधूक होती कि सचिन त्यांचे सीन सिनेमातून कापतील.
शेवटी जेव्हा सिनेमाची ट्रायल पार पडली आणि सिनेमा बघून लक्ष्मीकांत, अशोक आणि सचिन बाहेर पडले तेव्हा लक्ष्मीकांत यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सचिन यांना म्हंटल कि, 'मैत्री असावी तर अशी !'
अशी ही बनवाबनवी हा त्रिकुटाने एकत्र काम केलेला सिनेमा सुपरहिट ठरला. आजही अनेकजण हा सिनेमा आवर्जून बघतात.