सकाळ डिजिटल टीम
फिल्मी दुनियेत अभिनेत्रींची कारकीर्द अभिनेत्यांच्या तुलनेत खूपच कमी असते.
'गजनी' आणि 'रेडी' चित्रपटांची नायिका असीनला कोण ओळखत नाही. तिनं आपल्या दमदार अभिनयानं लोकांना वेड लावलंय. पण, लग्नानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. आजकाल ही अभिनेत्री तिचं घर सांभाळत असते.
तुम्ही 'वॉन्टेड' आणि 'टारझन: द वंडर कार' पाहिली असेल. या चित्रपटात प्रियाची भूमिका साकारणाऱ्या आयशा टाकियानंही आपल्या दमदार अभिनयानं लोकांची मनं जिंकली. तिचा फिल्मी दुनियेतला प्रवास चांगला सुरू होता, पण लग्नानंतर ती इंडस्ट्रीपासून दुरावली.
80 च्या दशकातील दिग्गज आणि सुंदर अभिनेत्री मंदाकिनीनं तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, एक वेळ अशी आली जेव्हा तिचं लग्न झालं आणि तिची फिल्मी कारकीर्द पूर्णपणे संपली.
सलमान खान आणि संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं ९० च्या दशकात अनेक हिट चित्रपट केले आहेत. पण, नंतर 2000 च्या सुरुवातीला तिनं प्रसिद्ध अभिनेते महेश बाबूसोबत लग्न केलं आणि नंतर फिल्म इंडस्ट्री सोडली.
९० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं आपल्या कारकिर्दीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय. 2002 मध्ये अभिनेत्रीनं लग्न केलं, त्यानंतर तिनं काही वर्षांसाठी इंडस्ट्रीला अलविदा केला.
जेव्हा-जेव्हा बॉलिवूडच्या दिग्गज आणि सुंदर अभिनेत्रींचा उल्लेख होतो, तेव्हा सायरा बानोचं नावही या यादीत येतं. तिनं वयाच्या 22 व्या वर्षी 42 वर्षीय दिलीप कुमारसोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीनं काही काळच चित्रपटांमध्ये काम केलं.