ईशा देओलनं ओठांची सर्जरी केली?

priyanka kulkarni

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.

काही महिन्यांपूर्वी ईशा आणि भरत तख्तानी (Bharat Takhtani) यांचा घटस्फोट झाला.

 शनिवारी (20 एप्रिल) ईशा देओल आणि तिची बहीण अहाना देओल या दोघी आई हेमा मालिनी यांचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मथुरा येथे गेल्या होत्या.

 ईशानं माध्यमांसोबत मथुरेतील पर्यटनाबाबत चर्चा केली. पण नेटिझन्सचे लक्ष मात्र ईशाच्या ओठांकडे गेले.

ANI नं एक व्हिडीओ ट्विटर (X) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ईशा ही माथुरेबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रश्न पडला आहे की, "ईशानं ओठांची सर्जरी केली आहे का?"

ईशाच्या ओठांच्या सर्जरीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ईशानं तिच्या ओठांच्या सर्जरीबद्दल अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.

ईशानं 2002 मध्ये रिलीज झालेल्या कोई मेरे दिल से पुछे या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

. ईशानं ना तुम जानोना हम,क्या दिल ने कहा, धूम, नो एन्ट्री यांसारख्या चित्रपटांमध्ये ईशानं काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.