Pranali Kodre
नताशा स्टॅन्कोविक आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांनी ४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
यानंतर सध्या नताशा त्यांचा चार वर्षांचा मुलगा अगस्त्यसोबत सार्बियामध्ये आहे.
यादरम्यान, अगस्त्यसोबत वेळ घालवतानाचे फोटो आणि व्हिडिओ नताशाने इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केले आहेत.
यातील अनेक फोटोंमध्ये अगस्त्य आई नताशाबरोबर वेगवेगळे पोसेज देताना दिसत आहे.
तसेच एका पार्कमध्ये डायनासमोरच्या स्टॅच्यूलाही उत्सुकतेने पाहात आहे.
अगस्त्य वाळूमध्येही खेळताना दिसत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हार्दिक आणि नताशाने वेगळे झाल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी अगस्त्याचे सहपालकत्व स्वीकारल्याचेही सांगितले.