सकाळ ऑनलाईन
तुकोजी होळकर अहिल्याबाईंना तिजोरीचा हिशोब व्यवस्थित देत नव्हते. 'महाराष्ट्राचे शिल्पकार तेजस्वीनी अहिल्याबाई होळकर' या पुस्तकात याचे संदर्भ दिले आहेत.
मल्हारराव होळकरांच्या विनंतीनुसार त्यांच्याकडं सोपवलेले राज्यकारभाराचे इलाखे पेशव्यांनी त्यांना बक्षीसपत्र करुन दिले होते.
याच बक्षिसपत्र दिलेल्या किंवा इनाम म्हणून दिलेल्या इलाख्याच्या तिजोरीला 'खासगी तिजोरी' म्हणून ओळखली जाई.
वार्षिक तीन लाख रुपये उत्पन्न असलेल्या तिजोरीत नंतर भर पडत, ती पंधरा लाखांपर्यंत गेली. उत्तम शेती आणि व्पापारामुळं हे उत्पन्न वाढलं.
मल्हाररावांनी अनेक लढाया करुन खासगी-सरकारी तिजोरीचं उत्पन्न वाढवलं, तसंच अहिल्याबाईंनी देखील चौथाई सरदेशमुखी वसूल करुन खासगी तिजोरी भर टाकली.
मल्हाररावांच्या मृत्यूवेळी या खासगी तिजोरीत १५ कोटी रुपये होते. याच कोषातून पुढे अहिल्याबाईंनी अनेक सुधारणा केल्या.
अहिल्याबाईंनी खासगी आणि सरकारी तिजोरीचा हिशोब कायम वेगळा ठेवला. खासगी खर्चाचा एक पै देखील सरकारी तिजोरीवर पडता कामा नये याची त्या काळजी घेत.
सासरे मल्हारराव होळकरांना पुण्यातील एका कर्जाची परतफेड करण्यास त्यांनी भाग पाडलं होतं, त्यामुळं आर्थिक व्यवहारांच्याबाबत अहिल्याबाई अगदीच काटेकोर होत्या हे लक्षात येतं.