Sudesh
आपल्याकडे कित्येक गावांची नावं ही अगदीच मजेशीर असतात. मात्र जर खरंच या नावांप्रमाणेच गावं असती तर? हीच कल्पना करून एका एआय आर्टिस्टने हे मजेशीर फोटो तयार केले आहेत.
नागपुरात सगळीकडे नावाप्रमाणेच नाग दिसत आहेत.
Sahixd या इन्स्टाग्राम हँडलवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. कानपूरमध्ये तर नुसता कानांचा खच पडलेला दिसतोय.
मध्य प्रदेशातील एका गावाचं नाव सागर आहे. जर खरोखरच याठिकाणी समुद्र असता, तर ते गाव असं दिसलं असतं.
पश्चिम बंगालच्या या गावामध्ये खरोखरच सगळ्या राण्या असत्या तर?
महाराष्ट्रातील चंद्रपूर गावाला नावाप्रमाणेच स्वतःचा वेगळा चंद्र मिळाला आहे.
धान म्हणजे धान्य. झारखंडमधील या गावात, नावाप्रमाणेच सगळीकडे धान्याची पोती दिसत आहेत.
जम्मू काश्मीरमधील हे गाव 'गुल' म्हणजेच फुलांनी भरलेलं आहे.
अरुणाचल प्रदेशच्या राजधानीमध्ये नावाप्रमाणेच सगळीकडे 'इटा', म्हणजेच विटा दिसत आहेत.
बिहारमधील हे गाव नावाप्रमाणेच असतं, तर हे मधाचं कोठार म्हणून ओळखलं गेलं असतं.
पश्चिम बंगालमधील चंदननगर हे गाव जर नावाप्रमाणे असतं, तर संपूर्ण शहरातच घमघमाट पसरला असता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.