Sudesh
आजकाल सर्वच क्षेत्रांमध्ये एआयचा बोलबाला आहे. आपल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एआय सक्षम आहे.
एवढंच काय, तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होईल हेदेखील एआय सांगू शकणार आहे.
डेन्मार्कमधील टेक्निकल युनिवर्सिटीतील वैज्ञानिकांनी हे एआय टूल तयार केलं आहे. Life2vec असं या टूलचं नाव आहे.
तुमचे हेल्थ रेकॉर्ड, शिक्षण, वय, पद आणि उत्पन्न या डेटाचा वापर करुन, तुम्ही आणखी किती वर्षे जगू शकता याचा अचूक अंदाज हे टूल करु शकतं असं संशोधकांनी सांगितलं आहे.
संशोधकांनी या एआय टूलला काही व्यक्तीचा 2008 ते 2016 दरम्यानचा डेटा पुरवला. यानंतर एआय टूलने या डेटामधील पॅटर्न तपासले.
यातील काही व्यक्तींचं निधन झालं होतं, तर काही अजूनही जिवंत होत्या.
यातील कोणत्या व्यक्तींचं निधन झालं आहे, आणि कोणत्या व्यक्ती जिवंत आहे हे या एआय टूलने ओळखलं.
या एआय टूलने व्यक्तीच्या तब्येतीबाबत आणि मृत्यूच्या तारखेबाबत 78% अचूक अंदाज सांगितला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.