Anuradha Vipat
'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे.
या चित्रपटात सारा अली खान देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.
1942 च्या भारत छोडो आंदोलनावर हा चित्रपट आधारित आहे.
चित्रपट 21 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट उषा मेहता यांचा बायोपिक आहे. यामध्ये उषा मेहता यांची भूमिका सारा अली खान साकारणार आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सारा अली खान रेडिओ जॉकीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे