Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला ९ विकेट्सने पराभूत केलं आणि अंतिम फेरीत धडक मारली.
दक्षिण आफ्रिकेने वनडे किंवा टी२० प्रकारातील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे.
त्यामुळे आता एडेन मार्करमच्या नेतृत्वात खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिले वर्ल्ड कप विजेतेपद मिळवणार का याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
दरम्यान मार्करमचा कर्णधार म्हणून आत्तापर्यंत मोठ्या स्पर्धांमधील विक्रम चांगला राहिला आहे.
मार्करमने २०१४ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असताना विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यावेळी त्याने ६ पैकी ६ सामने जिंकले होते.
मार्करमने २०२३ वनडे वर्ल्ड कपमध्ये तेंबा बाऊमाच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेचे २ सामन्यांत नेतृत्व केले होते, हे दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकने जिंकले होते.
त्यानंतर आता टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने मार्करमच्या नेतृत्वात ८ पैकी ८ सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
त्यामुळे मार्करमचा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून झालेली कामगिरी पाहाता, त्याच्याकडून त्याच्या देशाला मोठ्या अपेक्षा असतील.