अंकिता खाणे (Ankita Khane)
आपण हॉटेलमध्ये मुक्काम करतो. काही लोक सुट्टी घालवण्यासाठी देखील हॉटेलमध्ये राहतात.
परंतु हॉटेलमध्ये रहाणं किती सुरक्षित आहे यावर वारंवार प्रश्न चिन्ह उभ राहिलं आहे.
सोशल मीडियावर डच एअरलाइनच्या एका एअर होस्टेसने लोकांना आणखी एक प्रकार सांगितला.
तिने सांगितले की, तुम्ही जेव्हाही हॉटेलमध्ये थांबता तेव्हा सर्वात आधी तुमच्या पलंगाखाली पाण्याची बाटली जोरात फेकून द्या. ही कल्पना तुम्हाला सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.
आता तुम्ही विचार कराल की पलंगाखाली बाटली फेकून देण्याच्या सुरक्षिततेशी काय संबंध आहे? यामुळे कशी काय तुमची सुरक्षितता टिकू शकते?
तर हॉटेलमध्ये बाटलीचा आणि सुरक्षेचा काय संबंध असा प्रश्न तुमच्या मनात येईल.
पलंगाखाली पाण्याची बाटली टाकताच कळेल की पलंगाखाली कोणी लपले आहे की नाही. खाली कोणी नसेल तर पाण्याची बाटली दुसऱ्या बाजूने बाहेर येईल.
जर असे झाले नाही तर ताबडतोब खोलीतून बाहेर पळा.
कारण याचा अर्थ असा होतो की तुमच्या बेडखाली कोणीतरी लपलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.