Anuradha Vipat
अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते
आता देखील ऐश्वर्या हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
चाहते अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. आता पुन्हा एकदा ऐश्वर्याने तिच्या वडिलांसाठी एक पोस्ट केली आहे.
19 मार्च 2024 रोजी ऐश्वर्या रायच्या वडिलांची पुण्यतिथी आहे.अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे.
खास फोटो पोस्ट करत ऐश्वर्या हिने भावूक कॅप्शन देखील लिहिलं आहे. ‘माझे प्रिय डॅडी आणि अज्जा… मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करते… तुमच्या प्रार्थानांसाठी धन्यवाद…’ असं ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.