Anuradha Vipat
अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये व्यस्त आहे.
आता कान्स फिल्म फेस्टिव्हलहून परत येताच ऐश्वर्याच्यावर सर्जरी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
फेस्टिवलला जाण्यापूर्वी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली होती.
डॉक्टरांचा सल्ला घेऊन ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी गेली आहे.
मुंबईत परतल्यानंतर ऐश्वर्याच्या हाताची सर्जरी होणार आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा रंगली आहे.