Anuradha Vipat
२०२२ साली प्रदर्शित झालेला एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.
यामध्ये अजय देवगणने राम चरणने साकारलेल्या राजू याच्या भावाची भूमिका निभावली होती.
आठ मिनिटांच्या या भूमिकेसाठी अजय देवगणने घेतलेल्या मानधनाबद्दल माहिती नुकतीच समोर आली आहे.
नुकतंच याबद्दल ट्वीट करत अजय देवगणने ‘आरआरआर’मधील कॅमिओसाठी ३५ कोटींचे मानधन घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
आठ मिनिटांच्या भूमिकेसाठी ३५ कोटींचे मानधन याप्रमाणे एका मिनिटासाठी अजयने तब्बल ४.३५ कोटी रुपये मानधन आकारले असल्याचं स्पष्ट होत आहे.
अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘शैतान’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे