सकाळ डिजिटल टीम
जामनगर राजघराण्याचा पुढील वारस म्हणून माजी क्रिकेटपटू अजय जडेजाची निवड करण्यात आली आहे.
जामनगर राजघराण्याचा महाराजा म्हणुन निवड झाल्यानंतर अजय जडेजाच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.
अजय जडेजा भारतातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला असून त्याने संपत्तीतच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर व विराट कोहलीलाही मागे टोकले आहे. आपण भारताल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटींची यादी जाणून घेऊयात.
अजय जडेजा जामनगर राजघराण्याचा महाराजा झाल्यानंतर १४५० कोटी नेट वर्थसह तो भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर १२६० कोटी नेट वर्थसह यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
माजी कर्णधार एमएस धोनीची एकूण नेट वर्थ ९२४ कोटी आहे व तो यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ७८१ कोटी नेट वर्थसह यादीत चौथ्या स्थानी आहे.
४२० कोटी नेट वर्थ असलेला माजी भारातीय कर्णधार सौरव गांगुली यादीत पाचव्या स्थानी आहे.