Pranali Kodre
क्रिकेटमध्ये बऱ्याचदा दोन प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू एकमेकांना स्लेजिंग करताना दिसतात. मात्र, जर हे प्रकरण अति झालं आणि वादापर्यंत गेलं, तर पंच मध्ये पडतात.
कधीकधी सामनाधिकारी प्रकरण अधिक वाढले, तर काही खेळाडूंवर बंदीचीही कारवाई करू शकतात.
अशाच एका प्रकरणातून यशस्वी जैस्वालला अजिंक्य रहाणेने थोडक्यात वाचवलं होतं.
झाले असे की दुलीप ट्रॉफी २०२२ स्पर्धेत रहाणे वेस्ट झोनचा कर्णधार होता. त्याच्या संघाकडून यशस्वी जैस्वाल देखील खेळत होता.
त्यावेळी साऊथ झोनविरुद्धच्या सामन्यात जैस्वालने प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध स्लेजिंगची पातळी ओलांडली होती.
त्यामुळे रहाणेने पुढे येत आपल्याच संघातील जैस्वालला मैदानातून बाहेर पाठवले होते. याबाबत रहाणेने कर्ली टेल्स पॉडकास्टवर खुलासा केला आहे.
रहाणेने सांगितले की 'जैस्वाल कदाचीत माझ्यावर चिडलाही असेल, पण विरोधी खेळाडूला स्लेजिंग करताना तुम्ही तुमची पातळी नाही सोडली पाहिजे.'
रहाणेने पुढे सांगितलं 'मी त्याला मैदानातून बाहेर पाठवण्याचा निर्णय अंत:प्रेरणेने घेतलेला. त्यावेळी मला सामनाधिकारी म्हणाले की ते जैस्वालवर ४ सामन्यांची बंदी लावणार होते. पण मी जे केले ते त्यांनाही अपेक्षित नव्हते. नंतर त्यांनी जैस्वालवर बंदी घातली नाही आणि फक्त १५-२० टक्के दंड ठोठावला. त्यामुळे जैस्वाल तो सामनाही खेळू शकला.'