Ajit Agarkar : अजित - फातिमाची 'फिल्मी' लव्हस्टोरी

अनिरुद्ध संकपाळ

अजित आगरकर

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरची सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Ajit Agarkar

निवडसमिती अध्यक्षपदाच्या शर्यतीत

अजित आगरकर बीसीसीआयच्या निवडसमितीचा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याच्यासाठी बीसीसीआय निवडसमिती अध्यक्षाला देण्यात येणाऱ्या पगारात देखील वाढ करण्यासाठी तयार झालं आहे.

Ajit Agarkar

चर्चा अजितचीच

दरम्यान, अजित आगरकर निवडसमिती अध्यक्ष होणार म्हटल्यावर त्याच्या कारकिर्दीची अन् वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Agarkar

अजित - फातिमाची लव्ह स्टोरी

अजित आगरकरची लव्ह स्टोरी देखील जबरदस्त आहे. त्याने फातिमाला अनेक वर्षे डेट केल्यानंतर 2002 मध्ये लग्न केले.

Ajit Agarkar

फातिमा घडियाली

फातिमा ही त्याचा भाऊ मझहरसोबत अजित आगरकरचे सामने पाहण्यासाठी जात होती. त्याचवेळी अजित आणि फातिमाची ओळख झाली. मझहर हा आगरकर सोबत स्थानिक क्रिकेट खेळायचा. या दोघांचे लग्न होण्यात मझहरचा मोलाचा वाटा आहे.

Ajit Agarkar

घरातून लग्नाला विरोध

या ओळखीनंतर भेटीगाठी वाढू लागल्या अन् हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. अजित आगरकरची पत्नी मुस्लिम असल्याने या लग्नाला दोघांच्या घरातून विरोध होता.

Ajit Agarkar

विरोध झुगारून लग्न

मात्र हा विरोध झुगारून अजित आगरकर आणि फातिमा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी 1999 मध्ये पहिली मुलाखत दिली होती. त्यानंतर 2002 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांना राज नावाचा मुलगा देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Agarakar